शासन निर्णय :-
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी/पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी Qs World Ranking मध्ये २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या शैक्षणिक संस्था/विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत “सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविण्यात येईल.
या योजनेची व्याप्ती पुढीलप्रमाणे राहील :-
सदर योजना महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातीतील विद्यार्थ्यांकरिता लागू राहील. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेकडून ऑनलाईन स्वरुपात मागवून घेण्यात येतील.
शिष्यवृत्ती शाखा निहाय विभागणी :-
सदर शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे शाखा निहाय मर्यादा प्रत्येक वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे.
अभ्यासक्रमाचे नाव :
अभियांत्रिकी
वास्तुकलाशास्त्र
व्यवस्थापन
विज्ञान
वाणिज्य / अर्थशास्त्र
कला
विधी अभ्यासक्रम
औषध निर्माण शास्त्र
पदव्युतर
पदवी/पदविका
(MS/M.Tech)
डॉक्टरेट
(Ph.D)
५.जर एखादा विषय / अभ्यासक्रम करिता आवश्यक त्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर, i) त्याच विषयामधील पदव्युत्तर पदवी/पदविका ते पीएचडी या दोन्ही मध्ये आंतरबदल करण्याचे अधिकार निवड समितीला असतील. ii) वरील (i) प्रमाणे आंतरबदल करुनही जर एखाद्या विषयाकरिता विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर दुसऱ्या विषयाकरिता मंजूर संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध होत असतील तर त्याप्रमाणे बदल करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.
शासन निर्णय क्रमांक: सारथी २०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ
(ii) ज्या अभ्यासक्रमासाठी जास्त संख्येने विद्यार्थी उपलब्ध होतील त्या विषयासाठी प्राध्यान्य देण्यात येईल.
६.शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.
७. या शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट अ” मध्ये परदेशी शिष्यवृत्ती करीता शाखानिहाय मंजूर करण्यात आलेला अभ्यासक्रम नमूद करण्यात आला आहे. तसेच सदर योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता/अपात्रता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्य पध्दती इत्यादीची माहिती सोबतच्या "परिशिष्ट ब” मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.
८. या योजनेसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रुपये २५.०० कोटी इतका अतिरिक्त नियतव्यय सारथी या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या अखर्चित निधीतून भागविण्यात येणार आहे.
९. सदर शासन निर्णय, मा. मंत्रिमंडळाने दिनांक ०४.०७.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७२०१३३७१३६२१६ असा आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .