केंद्र शाळेवर जाऊन गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी केले वेतनवाढ मंजूर..

शालेयवृत्त सेवा
0

 




उपक्रम : नांदेड पं.सं. वेतनवाढ मंजुरी कॅम्प ! गटशिक्षणाधिकारी साहेबांचे शिक्षकांनी मानले आभार..

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड पंचायत समिती चे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय गटशिक्षणाधिकारी आदरणीय नागराज बनसोडे साहेब यांनी.दिनांक 25 जुलै 2023 रोजी उच्च प्राथमिक शाळा पुयनी केंद्र निळा येथे वर्षीक वेतनवाढी मंजूर करण्यासाठी कॅम्प चे आयोजन केले होते.

               आदरणीय नागराज बनसोडे साहेब आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती नांदेड येथील वरिष्ठ सहाय्य्क आदरणीय संतोष पांडे साहेब यांनी वेळातला वेळ काढून निळा केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वेतनवाढी, विकल्प नोंदी,आणि शैक्षनिक पात्रता धारण केलेल्या नोंदीवर सह्या करून सर्वसामान्य शिक्षकांना आणि मुख्याध्यापक यांना ऑफिस च्या हेलपाट्यापासून दिलासा दिला.

          प्रा.शाळा पुयनी च्या शाळेच्या वतीने आदरणीय नागराज बनसोडे साहेब, संतोष पांडे साहेब, केंद्रप्रमुख श्री घोडजकर सर यांचा यथायोग्य सन्मान केला आणि चहा व फराळाची उत्तम व्यवस्था केली. तसेच प्रा शा धानोरा चे मुख्याध्यापक श्री प्रमोद फुलारी सर यांचा काल वाढदिवस झाला त्या निमित्ताने केंद्राच्या वतीने साहेबानाच्या हस्ते शुभेच्छा दिल्या. प्रा.शाळा एकदरा चे मुख्याध्यापक श्री श्रीकांत कुलकर्णी सर आणि पतंगे सर यांनी खूप सहकार्य केले.

सदरील कॅम्प साठी खालील मुख्याध्यापक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कैलास पोहरे कें.प्रा शाळा निळा / वाटेगावकर मॅडम मरळक बु, / कुलकर्णी सर एकदरा, /पडगिलवार सर पुयनी / राजेश रामगिरवार सर, ' वाघमारे सर चिखली बु. / ढवळे सर,बडूरे सर तळणी / प्रमोद फुलारी धानोरा / संजय राठोड वडवना /यमलवाड सर पोखर्णी / धोत्रे मॅडम मरळक खु. / पाम्पटवार सर खडकी / सोनटक्के सर लांडगीरा / किशोर नरवाडे चिखली खु / तलवाडे सर वैशाली नगर / नितीन दुगाणे सर आणि प्रा शा पुयनी येथील नरवाडे सर आणि भुयारे सर उपस्थित होते.

         दिनांक 26 जुलै 2023 रोजी सर्व सेवापुस्तिका गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा कराव्यात ही विनंती. आदरणीय नागराज बनसोडे साहेब आणि संतोष पांडे साहेब यांचे केंद्राच्या वतिने मनःपूर्वक खूप खूप आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)