सावधानतेचा इशारा : ढगांच्या गडगडाटासह मुसळधार होणार पाऊस !
नांदेड (जिमाका) :
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 22 जुलै 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 22 जुलै 2023 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट व दिनांक 23 ते 26 जुलै 2023 या चार दिवसासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.
दिनांक 22 जुलै 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दिनांक 23 ते 26 जुलै 2023 ह्या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .