सेल फोनचा जनक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावल्याचे आपल्याला दुःख होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याचे कारण म्हणजे गरजेपेक्षा खूपच अधिक प्रमाणात मोबाईलचा वापर केला जात आहे.
मार्टिन यांनी जगभरातील मोबाईल युजर्सना मोबाईल मध्ये वेळ घालू नका त्यापेक्षा खरे आयुष्य जगा असा कळकळीचा सल्ला दिला आहे.
93 वर्षीय मार्टिन यांनी लोकांनी आता त्यांच्या आयुष्यातील प्राथमिकता ठरवायला हव्यात असेही मत व्यक्त केले आहे. 1970 च्या दशकात पहिला मोबाईल बनविणाऱ्या मोटोरोला पथकाचे मार्टिन निरीक्षक होते. 1973 मध्ये सार्वजनिक स्वरूपात पोर्टेबल मोबाईलचा वापर करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. एका मुलाखतीत त्यांनी दिवसातील फक्त पाच टक्के वेळ मोबाईलला घालवतो असे स्पष्ट केले होते. मात्र आज घडीला चीन खालोखाल भारतीय युजर्स जगात सर्वाधिक ॲप्स डाऊनलोड करत आहेत आणि कोरोना काळात मोबाईलचे व्यसन अधिक वाढले आहे असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. भारतीयांचा विचार करायचा तर गेल्या वर्षात भारतीयांनी 69.9 कोटी तास मोबाईल पाहण्यावर झालेले आहेत. अन्य देशाच्या तुलनेत भारतात इंटरनेट स्वस्त असल्याचे कारण त्यामागे दिले जात आहे. संवाद मनोरंजन आर्थिक देव घेऊ यासाठी मोबाईल लोकप्रिय ठरले आहेत भारतीय व्यक्ती दररोज सरासरी 4.7 तास मोबाईलवर घालवितात.
मोबाईल विना जग वाटे भकास !
जगभराचा विचार करायचा तर किशोरवयींना मध्ये मोबाईलचे व्यसन वाढत चालले आहे तर अन्य लोकांमध्ये अनेक वाईट लक्षणे समोर येत आहेत. उदाहरणार्थ 87.8 टक्के युजर्स मोबाईल घरी राहिला तर घाबरे होतात. 73.4 टक्के तर टॉयलेट मध्ये सुद्धा मोबाईल नेतात. 69 टक्के युजर्स रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर मोबाईल चेक करतात. 96 टक्के युजर्स फोन जवळ घेऊन झोपतात तर 43.5 टक्के युजर्स दिवसाला किमान 50 ते 100 वेळा फोन अनलॉक करतात.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .