जिल्हा विकास आराखडा कार्यकारी समितीवर डॉ गोविंद नांदेडे याची निवड..

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

         जिल्ह्याच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी  राज्य शासनाने जिल्हा विकास आराखडा कार्यकारी समितीचे गठण केले आहे. या समितीवर मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासन निर्देशानुसार विविध क्षेत्रातील अनुभवी,व्यासंगी आणि आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कार्य सिद्ध केलेल्या सन्माननीय सदस्यांची  नियुक्ती केली आहे. 

         राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांची शिक्षण क्षेत्राच्या आराखडा निर्माणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने जिल्ह्यातील गरजा  , आव्हाने आणि समस्या यांचा अभ्यास करून त्यांचा आराखड्यात अंतर्भाव करावयाचा आहे. या समितीवर विविध क्षेत्रातील अनन्यसाधारण कार्य सिद्ध केलेल्या सोळा तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ नांदेडे हे एक शिक्षकी शाळेत  कलंबर खुर्द येथे  प्राथमिक शिक्षक होते. 

         ग्रामीण प्राथमिक शिक्षक ते राज्याचे शिक्षण संचालक असा त्यांचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे. दोन पीएचडीसह अनेक विषयात सुवर्ण पदकासह एम ए केलेल्या नांदेडे यांचे अजूनही शिकणे सुरूच आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या पूर्व शिक्षण संचालकांना शिक्षण हाच समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा शाश्वत मार्ग असतो या सिद्धांतावर दृढ विश्वास आहे. योग्य तज्ज्ञ, व्यासंगी व्यक्तींची जिल्हा विकास आराखडा कार्यकारी समितीवर नियुक्ती केल्याप्रीत्यर्थ  जिल्हाधिकारी यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)