मा.श्रीमती मिनल करनवाल (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या तर्फे रुजू होताच सर्व शिक्षकाना दिला शुभेछा संदेश आणि शिक्षक प्रेरणा परिक्षेविषयी केले आव्हान !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करणवाल यांनी कार्यभार स्वीकारला असून त्या शनिवारी रुजू झालेल्या आहेत. यापूर्वी मीनल करणवाल ह्या नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या 2019 बॅचच्या आयएएस आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची पदोन्नतीने लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. या रिक्त जागेवर शासनाने मा. मीनल करणवाल यांची नियुक्ती केली आहे.शनिवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, सामान्य प्रशिक्षण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे, समाज कल्याण अधिकारी सत्तेंद्र अवलवार , शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, स्वीय सहाय्यक अभय नलावडे , बालाजी नागमाळ आधी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .