३५० वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासकिय व कार्यालयीन पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत शासन निर्णय निर्गमित.. | 350th Coronation of Shiva

शालेयवृत्त सेवा
0

 

                                  ( बोधचिन्ह )

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोध्दचिन्ह चित्रित करण्यात यावे !

मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

“३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्यानुषंगाने, राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार / प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा (Logo) वापर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

“३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या परिशिष्ट- “अ” मध्ये सुनिश्चित केलेल्या विशेष बोधचिन्हाचा (Logo) शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमाच्या प्रचार / प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारांत कटाक्षाने वापर करण्यात यावा. तसेच, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोध्दचिन्ह चित्रित करण्यात यावे. सर्व मंत्रालयीन / प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारीत कराव्यात.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०७२४१७३५५५७९२३ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)