‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी 20 ऑगस्ट रोजी परिक्षा | NASA Training Program

शालेयवृत्त सेवा
0


 विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन


एमपीसी न्यूज – अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (Pune) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.


भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता 6 वी ते 10 वी च्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 अशी आहे.


विद्यार्थ्यांना http://www.swan-foundation.com/ यावर नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाऊंडेशनचे संस्थापक संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.


सुदेष्णा परमार म्हणाल्या, “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल.


यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”

आयेशा सय्यद म्हणाल्या, “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील (Pune ) शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून नावनोंदणी करता येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी सुरु राहील.


20 ऑगस्ट रोजी नावनोंदणी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ही परीक्षा होईल. परीक्षेचा निकाल 28 ऑगस्ट 2023 रोजी घोषित होईल. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सप्टेंबरमध्ये सत्कार होणार आहे.

नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. अमेरिकेला 35 व सिंगापूर येथील सायन्स सेंटरला 35 अशा 70 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांचा सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे.”


एम. तिरुमल म्हणाले, “आज पालक आपल्या मुलाने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावे, याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल.”

“आज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे.


जगातील 195 देशांपैकी फक्त 72 देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले.”

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)