इस्त्रो (ISRO) श्रीहरीकोटा अंतरिक्ष केंद्र शैक्षणिक सहलीसाठी हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) जि.प.शाळेच्या श्रावस्ती व किरणची निवड..

शालेयवृत्त सेवा
0

 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील जि.प.शाळेतील विज्ञान व गणित विषयांत प्राविण्य असलेल्या 50 विद्यार्थ्यांना श्रीहरी कोटा येथील सहलीसाठी निवडण्यात आले. या निवडीसाठी इयत्ता ५ वी ते ८ वीच्या सर्व जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांची केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तर या वेगवेगळ्या टप्प्यांवर अतिशय कठिण स्वरूपात लेखी व प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात आल्या.यासाठी प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे तीन विद्यार्थी निवडण्यात आले. यामध्ये ISRO जिल्हास्तरिय निवड चाचणीमध्ये हिमायतनगर तालुक्यातुश तिन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये जि.प.कें.प्रा.शाळा खडकी बा.च्या 

     1) कु.श्रावस्ती चंद्रकांत भगत - 8 वी

     2)किरण बबन भगत इयत्ता -   8 वी

    

      या गुणवंत विद्यार्थ्यांनीनी या निवड परिक्षेत यश मिळवले आहे.

 जि.प.शाळांमधील या गुणवान विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आणखी आवड निर्माण व्हावी, त्यांना नवनवीन संशोधने समजावीत व प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी श्रीहरी कोटा येथील सहलीचा अनुभव खूप काही उर्जा पुरवणार आहे. मुख्याध्यापक,शिक्षक व प्रशासनातील अधिकारी वर्गानी वेगवेगळ्या टप्प्यांवर या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टांमुळे ही संधी निर्माण झाली आहे. तीन महत्त्वाच्या ठिकाणी ही वैज्ञानिक सहल जाणार आहे.

१) श्रीहरी कोटा , आंध्रप्रदेश 


२) थुंबा, तिरूअनंतपूरम केरळ येथील स्पेस म्युझियम.


३) विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ऍन्ड टेक्निकल म्युझियम बंगळुरू, कर्नाटक. 

      वरील महत्वाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या वैज्ञानिक सहलीचा अनुभव मिळणार आहे. हिमायतनगर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री शिवानंद शिवाचार्य साहेब यांनी शाळेतला भेट देऊन शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थी, पालक ,मार्गदर्शक शिक्षक श्री.अमोल जाधव व श्री.श्याम रायवार यांचा सत्कार केला.शाळेचे मुख्याध्यापक श्री भूतनर सर ,विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वृंदाचे खूप खूप अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.याप्रसंगी गावचे सरपंच श्री संजय सूर्यवंशी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री तानाजी सोळंके, उपाध्यक्षा श्री गजानन सूर्यवंशी,सरसम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कोकुलवार सर उपस्थित होते.शाळेतील शिक्षक इम्रानखान पठाण ,शंकर जाधव,सतिश इंगळे, नागनाथ नागरगोजे , गणेश राचुरे, श्रीमती माळी मॅडम यांनी मुलींचे अभिनंदन केले.

     श्रावस्ती व किरण या भगत भगिनींनी वरील सहलीसाठी यश संपादन करुन शाळेचे, गावाचे नाव केले आहे.अशी भावना सर्व गावकऱ्यांनी बोलून दाखवली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)