नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जागतिक महिला दिनानिमित्त जवळा देशमुख येथील मुलींनी उत्स्फूर्तपणे दिवसभर शाळेचे कामकाज करीत महिला दिन साजरा केला. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे यांच्या प्रेरणेने महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलींनीच अभिरुप शाळा चालवून अध्यापन व शालेय कामकाजाचा आनंद घेतला.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस विविध उपक्रमानी जगभरात साजरा केला जातो. प्राथमिक शाळेच्या पातळीवर जवळा देशमुख येथील शाळेतील मुलींनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सेवक आदींची भूमिका बजावत शालेय अध्यापन आणि कामकाजाचा आनंद घेतला. यात मुख्याध्यापक म्हणून साक्षी गच्चे, पर्यवेक्षक म्हणून श्रुती मठपती तर सहशिक्षिका म्हणून नंदिनी टिमके, श्रावस्ती गच्चे वैभवी शिखरे, अक्षरा शिखरे, अनुष्का झिंझाडे, दिपाली गोडबोले यांनी काम पाहिले. शेवटच्या सत्रात मनोगत व्यक्त करुन अभिरुप शाळेची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .