हिंगोली ( शालेय वृत्तसेवा ) :
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली येथे संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भानुदास पुटवाड ,राज्य सरचिटणीस माधव वायचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार२०२२चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मकोडी येथील उपक्रमशिल शिक्षक बालाजी जबडे व वसमत तालुक्यातील शांतीविदयानिकेतन माध्यमिक विद्यालय सातेफळ येथील पालावरीची शाळा चालविणारे उपक्रमशिल माध्यमिक शिक्षक शामराव रावले यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालुन व पेढे खाऊ घालुन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याविषयी व पुढील भविष्यात पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करण्याचे मार्गदर्शन प्राचार्य भानुदास पुटवाड यांनी केले तर राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी प्रथम आपले कर्तव्य जबाबदारी ने पुर्ण करावे , हक्कासाठी संघटना आपल्या सदैव सोबत आहे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव वायचाळ यांनी केले तर सुत्रसंचलन महारूद्र घेणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस संजय गिरी यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग गिरी,परिसराम हेंबाडे,पंडित अवचार ,रमेश गंगावणे,रेणुका देशपांडे, गोविंद थोरात ,विनायक भोसले, वंदना सोवितकर यासह आदि नी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .