नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ ( महाराष्ट्र राज्य ) या नोंदणीकृत मंडळाच्या मराठवाडा विभागीय 'सचिव पदी' माहूर येथील क्रियाशील शिक्षक कवी स्तंभलेखक शेषराव पाटील यांची निवड करण्यात आली.
शिक्षक हा सर्व गुण संपन्न असतो पण त्याला योग्य विचारमंच उपलब्ध करून द्यावं या उद्देशाने हे मंडळ कार्यरत आहे. साहित्य -कला -क्रीडा प्रकारात शिक्षक राज्य नव्हे देश पातळीवर जावेत यासाठी मंडळ सक्रिय आहे. या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविल्या जाते. जिल्हा, विभागीय, राज्य संमेलने आणि क्रीडा स्पर्धा घेतली जातात. उपक्रशील शिक्षकांना विविध पुरस्काराने सन्मानित केल्या जाते.
राज्याध्यक्ष नटराज मोरे आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी एस.एस. पाटील यांना विभागीय सचिवपदीच्या निवडीचे पत्र नुकतेच दिले आहे. त्यामुळे त्यांचे साहित्यप्रेमी माहूरचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव, स्तंभलेखक उत्तम कानिंदे, चित्रकार रंजीत वर्मा, कवी मिलिंद कंधारे, नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, भोला सलाम, कवी सुरेश शेरे, भाग्यवान भवरे बाबुराव माडगे , श्याम राठोड, सुधीर जाधव , मनोज बारसागडे, विजय घाटे, प्रवीण वाघमारे, मनोज वर्धे,धनंजय गि-हे , आदिनी अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .