नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतल्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निघाल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त केला जात आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांचे दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी चे पत्र क्रमांक 1599 व विविध संघटनाच्या मागणीचे निवेदन यानुसार मागणी केल्याप्रमाणे मार्च 2023 पासून उन्हाची तीव्रता वाढल्याचे लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक बदलण्याबाबत विविध स्तरावरून मागणी करण्यात येत होती. या मागणीच्या विचार करता नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या दिनांक 15 मार्च 2023 पासून पुढील वेळेत भरण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
सोमवार ते शुक्रवार शाळेची वेळ सकाळी 8.30 ते 1.30 व शनिवार शाळेची वेळ सकाळी 8.30 ते 11.30 आणि मध्यंतर अंतरासाठी वेळ 15 मिनिटे ठेवण्यात यावी. दिनांक 15 मार्च 2023 पासून शाळेच्या वेळेत वरील प्रमाणे बदल करण्यात येत असून त्याप्रमाणे तासिकेचे नियोजन शालेय स्तरावरून करण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषद नांदेड यांनी 14 मार्च 2023 रोजी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या संयुक्त स्वाक्षरीने निर्गमित केला आहे. त्यामुळे आता शाळा सकाळ सत्रात भरण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .