मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यासह प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक संघटनाने मंगळवारी संप पुकारलेला आहे. याच दिवशी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचे अनेक विषयाचे पेपर असल्याने परीक्षेचे नियोजन कलपडण्याची शक्यता आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या सध्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत त्यातच 14 मार्च रोजी दहावीचा पेपर नसला तरी बारावीच्या परीक्षेचे तीन पेपर या दिवशी आहेत. यात सकाळी 11 वाजता व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पहिला पेपर सकाळी 11 ते 1.30 या वेळेत आहे त्यानंतर 11ते 2 या वेळेत जनरल सिविल इंजिनिअरिंग कृषी वाणिज्य गटातील इतर पेपरही या दरम्यान आहेत.
दुपारच्या सत्रात तांत्रिक विषयाचे अनेक पेपर आहेत या दिवशी जुन्या पेशंटच्या मागणीसाठी शिक्षक मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाल्यास हे पेपर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुनी पेन्शन मिळावी अशी माफक अपेक्षा घेऊन कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .