नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जागतिक वन दिनानिमित्त निसर्गाविषयी मुलांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं निसर्गातील बदल मुलांनी जाणून घ्यावेत वृक्षांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्यास जोड म्हणून वर्ग पाचवीच्या मुलांनी विविध फळांच्या बियांचा संकलन करून सीड बँक तयार केली आहे.
यात प्रामुख्याने सिताफळ, चिकू, चिंच, जांभूळ ,बोर ,खारीक, टरबूज ,पपई ,टमाटे वांगे आदींचा मोठ्या प्रमाणावर बियांचा संकलन मुलांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तर बिया जमा करून त्या बियांपासून जागतिक वन दिन हे आकर्षक नाव तयार करण्यात आले नंतर मुलांनी पर्यावरणासाठी झाडे लावा देश वाचवा दुनिया वाचवा, वनो की जब रखवाली होगी तो पृथ्वी पर हरियाली होगी, वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका पर्यावरणाची रक्षा हीच जगाची रक्षा असे उद्बोधन पर नारे देऊन समारोप करण्यात आला.
सदरील सीड बँक यशस्वी करण्यासाठी साईप्रसाद वाघमारे, सोहम सोरटे, दैवदीप गुंडेकर, चैतन्या ढेपे नंदिनी ढगे, श्रावणी येडे, स्वरांजली खानसोळे, स्वरा पुणेबोईनवाड आदी परिश्रम घेत आहेत तसेच बिया संकलन करणाऱ्या सर्व मुलांचे जागतिक वन दिनाचे औचित्य साधून प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. येणाऱ्या काळात या सर्व बियांपासून स्वतंत्र रोपवाटिका विकसित करण्याचा मानस असल्याचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .