नांदेड ( शरद जोगदंड ) :
दिनविशेषा नुसार सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंददायी शिक्षण देणाऱ्या जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक ज्ञानोबा जोगदंड यांच्या मातोश्री कौतुकबाई दिगांबर जोगदंड तर शकुंतला जोगदंड , शिक्षिका महिला प्रतिनिधी सुजाता पांचाळ मॅडम , महिलेच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थीनी राधिका गालेवाड , रोहिणी इंगोले, रेवा गायकवाड , अक्षता शेळके आदींची उपस्थिती होती. प्रारंभी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब व शिक्षणाची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संगीत विशारद शिक्षक सचिन सुर्यवंशी यांनी महिला गौरव गीत गावून कार्यक्रमाची सुरुवात केली. शिक्षकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश भद्रे सर यांनी केले. दरम्यान झालेल्या कार्यक्रमात शेख परविन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयता दुसरीच्या राधिका गालेवाड या मुलीने महिलादिन गीतांवर , तर रोहिणी इंगोले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रेवा गायकवाड , अक्षता शेळके या इयता तिसरी च्या मुलींनी ' जन्म बाईचा ' या गाण्यावर तसेच राठोड मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली तनुश्री सोनकांबळे व विनिता चव्हाण या तिसरीच्या मुलींनी बंजारा गीतावर ' शकुंतला गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोही जायम्हेत्रे , आलिया शेख या नर्सरीच्या मुलींनी ' मुलगा मुलगी समान 'या गाण्यावर तसेच जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरूषी इमडे ' रितिका बिजले , समृद्धी सस्त्रमोड , पोतदार मॅडम च्या मार्गदर्शनाखाली तन्मय जगताप , रुद्र पेड या नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादरीकरण करून चांगल्याच टाळ्या मिळविल्या.
याच दरम्यान रेवा गायकवाड , अक्षता शेळके , प्रीती जाधव , सांची धनवाडे या इयता तिसरीतील मुलींनी 'बेटी बचाव बेटी पढाव ' सुंदर नाटिका सादर केली. या नाटिकेतून शिक्षणाचा संदेश ही विद्यार्थ्यांना देण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ' माझी आवडती शिक्षिका ' या विषयाची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना यावेळी मुख्याध्यापक जगदीप जोगदंड व संचालक ज्ञानोबा जोगदंड यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यात आर्या श्रीरामे , अमृता चौंडे , वैष्णवी गुट्टे , अनुष्का शिंदे , गायत्री डोईफोडे , सरस सुबनवाड , रेवा गायकवाड , श्रेयस पाटील , प्रीती जाधव , रिहान शेख आदी विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेचे बक्षिस जिंकले.
यावेळी संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व महिला शिक्षिकेचा गुलाबपुष्प , पुस्तक ' दोन लेखणी , पेढा भरून सन्मान करण्यात आला. दरम्यान झालेल्या भाषणात सौ. सुजाता पांचाळ मॅडम यांनी महिला दिनाचे महत्व व महिला काल आज आणि उद्या याबाबत महिलांचे योगदान विशद केले. संचालक ज्ञानोबा जोगदंड यांनी महिलांचे समाजातील स्थान व मुलगी शिकली तरच प्रगती होऊ शकते या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले . इतिहासातील पहिल्या महिला यांचे योगदान व महिलांची विविध नाती यावरील एक कविता सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड , सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , पालक मोठ्यासंख्येनी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .