जिल्हा परिषद चाभरा शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा केंद्र निमगाव ता. हदगाव शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. शाळेच्यावतीने थोर समाजसेविक तथा आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल हदगाव पंचायत समितीचा व महिला दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त शिक्षिका मा.सौ.विजया पंढरीनाथ पिन्नलवार व मा.सौ.रंजिता दादाराव भिसे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मा.सौ.विजया पिन्नलवार हया होत्या तर  प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ.रंजिता भिसे, मा.बालासाहेब लोणे, मा.बळीराम कदम, मा.अशोक फुलवळकर, मा.विनायक मुलंगे, मा.पांडुरंग चव्हाण, मा.सुनील कंठाळे, मा.राजेश चिटकुलवार आदींची उपस्थित होते.

      या प्रसंगी कु.संस्कृती मनुरे, कु.आदिती सुकळकर, कु.स्नेहल साळवे, कु.क्रांती लोणे,कु.अक्षरा गोमासे वकु.वैशाली खुणे, कु.राजनंदनी शेलगावकर व आयुष कल्याणकर विद्यार्थांनीं समुहगित गायन केले. कांही विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.बालासाहेब लोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.पांडुरंग चव्हाण, मा.विनायक मुलंगे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुअ मा.चंद्रकांत दामेकर, मा.बालासाहेब लोणे, मा.बळीराम कदम, मा.अशोक फुलवळकर, मा.विनायक मुलंगे, मा.पांडुरंग चव्हाण, मा.सुनील कंठाळे, मा.राजेश चिटकुलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)