जिल्ह्यातील 48 विद्यार्थ्यांचे इस्त्रो सहलीसाठी निवड..

शालेयवृत्त सेवा
0

 श्रीहरीकोठा येथे जाणार विद्यार्थ्यांची सहल !



प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी घेणार सहलीचा आनंद !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

इयत्ता पाचवी ते आठवीला शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांची सहल इस्त्रो अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोठा येथे नियोजित आहे. यासाठी जिल्हास्तरावरील विद्यार्थी निवडीची परीक्षा 10 मार्च रोजी गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आली होती. त्यात 167 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 48 विद्यार्थ्यांची निवड या सहलीसाठी करण्यात आली आहे. 


येत्या 28 मार्च रोजी 48 विद्यार्थ्यांची सहल इस्रो श्रीहरीकौठा येथे जाणार असून विद्यार्थ्यांची संशोधन दृष्टी वाढीस लागावी यासाठी जिल्हाभरात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम असून केंद्रस्तरावर 28 फेब्रुवारी व तालुकास्तरावर तीन मार्च रोजी विद्यार्थी निवडीच्या परीक्षा संपन्न झाल्या. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करून जिल्हा वरून केंद्र आणि तालुक्यांना पुरविण्यात आल्या ही सर्व परीक्षा अत्यंत गोपनीय पद्धतीने घेण्यात आली. 


त्यानंतर तारीख 10 मार्च रोजी तालुकास्तरावर गुणांकन मिळवलेले प्रत्येकी दहा विद्यार्थी याप्रमाणे 167 विद्यार्थ्यांची निवड परीक्षा जिल्हास्तरावर नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. यातून सहलीसाठी 48 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)