डॉ.आंबेडकर जयंती आणि रमजान ईद निमित्त कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रलंबित सन अग्रीम सह पाच एप्रिल पूर्वी करावे - इब्टा

शालेयवृत्त सेवा
0


मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन !



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व पवित्र रमजान ईद निमित्त नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2023 चे मासिक वेतन प्रलंबित सन अग्रीम सह पाच एप्रिल पूर्वी करणे संदर्भातचे निवेदन इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन ( इब्टा ) नांदेडच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडमला नुकतेच देण्यात आले आहे. 


येत्या 14 एप्रिलला संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व याच महिन्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण आहे. हे दोन्ही सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे महा फेब्रुवारी 2023 चे मासिक वेतन आयकर भरण्यात गेलेले असल्याने शिक्षक व कर्मचारी आर्थिक संकटात आहे. 


त्यामुळे नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2023 चे मासिक वेतन प्रलंबित फेस्टिवल सह पाच एप्रिल पूर्वी अदा करून उपकृत करावे असे असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे. अन्यथा संघटनेस नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. याची पूर्णता जिल्हा परिषदेवर जबाबदारी असेल असेही या निवेदनात म्हटलेले आहे. 


या निवेदनावर इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोणे, बबनराव घोडके, नागनाथ येरमलवाड, निलेश गोधने, विजय इंदुरकर, शेख अहमद, उत्तम कानिंदे, सदाशिव माने, रमेश मुनेश्वर विजयकुमार गजभारे, बालाजीराव थोटवे, माधव कांबळे,  वीरभद्र मिरेवाड, मिलिंद राऊत, बाबुराव भोजराज, अजय राठोड, आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)