ग्रामीण मुलांना आधी इंग्रजी बोलायला शिकवा व्याकरणाचे मग बघू.. पूर्व शिक्षण संचालकांचे मत

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      ग्रामीण खेड्यापाड्यातील  मुलांना आधी इंग्रजी बोलायला शिकवू मग  व्याकरणाचे काय ते बघू . व्याकरणाची मनातील अनाठाई भीती काढून टाकूया. मुले इंग्रजी  बोलायला लागली की कार्यात्मक  व्याकरण आपोआप शिकू लागतील असा सल्ला राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी दिला. ते शंकर कुद्रे लिखित शंकर कुद्रेज स्पोकन इंग्लिश  या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ नांदेडे बोलत होते. 


       या प्रसंगी शंकर कुद्रे यांनी लिहिलेल्या संदेश, सारे प्रेमासाठी, फुले वेचताना, या अन्य तीन पुस्तकांचे प्रकाशनही डॉ नांदेड आणि सुप्रसिद्ध लेखक डॉ सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार जितेशभाऊ अंतापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी डॉ सुरेश सावंत यांनी लेखक शंकर  कुद्रे यांच्या चारही पुस्तकातील लेखन सामर्थ्याचे विश्लेषण केले. शंकर हा शिक्षकांना प्रेरणा देणारा विद्यार्थी अशी लेखकाची वेगळी ओळख करून दिली. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक शंकर कुद्रे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी चार ही पुस्तकांच्या निर्मिती मागील प्रेरणा उलगडून दाखवली. आपल्या अध्यक्षीय समारोपात आमदार जीतेशभाऊ अंतापुरकर यांनी लेखकांनी चार पुस्तके एकच वेळी प्रकाशित केल्याचा आनंद व्यक्त करून त्यांच्या भावी लेखन कार्यास शुभकामना दिल्या. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार , बालाजी थोटवे, डी के तोटरे, एच एस  खंडागळे, बसवराज पाटील , संजीवनी बेंजलवार , शेख फैज, आदींची समायोचित भाषणे झाली. 

       या कार्यक्रमास डॉ माधव लोकडे, डॉ विनायक मुंडे, डॉ उत्तम इंगोले, प्राचार्य डॉ हिंगोले, प्रा उत्तम कांबळे, मच्छिंद्र गवाले, कैलास येसगे, प्रा शेरिकर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर कुद्रे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)