राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबींसंदर्भात e-HRMS

शालेयवृत्त सेवा
0

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबींसंदर्भात e-HRMS



(Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या e-HRMS प्रणालीत करण्यात येत आहे. सदर e-HRMS प्रणाली https://115.124.119.238

या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती e-HRMS प्रणालीवर भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर प्रणालीबाबत एनआयसी मार्फत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

तथापि, असे निदर्शनास आले आहे की, काही मंत्रालयीन विभागांत तसेच त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अधिकारी/ कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती e-HRMS प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सर्व मंत्रालयीन तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

परिपत्रक-

१. सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की, नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांची सेवा पुस्तके e-HRMS प्रणालीमध्येच भरण्यात येतील याची दक्षता घेण्यात यावी.

२. काही अपरिहार्य कारणामुळे ज्या नवनियुक्त अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तके e-HRMS मध्ये भरणे शक्य झालेले नाही /होणार नाही त्यांची सेवा पुस्तके त्यांच्या सेवा नियमित करताना कोणत्याही परिस्थितीत e-HRMS प्रणालीमध्ये भरण्यात यावीत.

३. सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या विभागातील तसेच त्यांच्या नियत्रंणाखालील कार्यालयांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबी e-HRMS प्रणालीमध्ये भरणेबाबत कार्यवाही करावी.

४. अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके Scanning (Along with bookmarking) करुन e-HRMS

प्रणालीवर अपलोड करण्याची कार्यवाही दि.३१/३/२०२३ पूर्वी पूर्ण करण्यात येईल याची सर्व विभाग व कार्यालयांनी दक्षता घ्यावी.

५. सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके यापुढे e-HRMS प्रणालीवरच उपलब्ध होतील याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी.

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५/१८ (र.व का.)

e-HRMS प्रणालीमध्ये सेवापुस्तकविषयक आवश्यक माहिती नियमित भरल्यामुळे खालीलप्रमाणे सुविधा आस्थापना शाखांना उपलब्ध होणार आहेत-

१. सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवा पुस्तके वेळोवेळी अद्ययावत राहण्यास मदत होईल.

२. जे अधिकारी / कर्मचारी रजेवर आहेत त्यांचा अहवाल उपलब्ध होईल.

३. वर्षातून दोनदा (१ जानेवारी व १ जुलै) अधिकारी व कर्मचारी यांच्या खात्यात रजा (EL, CL, HPL) आपोआप जमा होतील.

४. ५०/५५ वर्षावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवांचे पुनर्विलोकन करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध होईल.

५. ज्या अधिकारी/कर्मचारी यांना स्थायीत्व प्रमाणपत्र प्राप्त नाही त्यांची यादी उपलब्ध होईल.

६. ज्या अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरू आहे त्यांची यादी उपलब्ध होईल.

७. ज्या अधिकारी/कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरू आहे त्यांची यादी उपलब्ध होईल.

८. जे अधिकारी/कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत त्यांची ६ महिने आगोदर यादी उपलब्ध होईल.


उपरोक्तप्रमाणे विभाग / कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके e-HRMS प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने संबंधित आस्थापना व रोख शाखा यांनी तातडीने कार्यवाही करावी. वरील सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच या सूचना सर्व संबंधितांच्या निर्दशनास आणण्यात याव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)