जि.प. शिक्षकांच्या बदल्यांसाठी यंदा पुन्हा अभ्यास गटाची नियुक्ती!
नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या यंदा झाल्या. सर्व प्रक्रिया गेल्या आठवड्यात पूर्ण झाली. जिल्ह्यात ३०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ऑनलाइन बदल्या असल्या तरी त्याबाबतही मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. आता पुढील वर्षाच्या बदल्यांपूर्वी प्रक्रियेत सुधारणा व्हावी, तक्रारींचे निरसन व्हावे यासाठी शासनाने अभ्यासगटाची स्थापना केली आहे.
दरम्यान, अभ्यासगटाचा अहवाल त्यावर संघटनांचे म्हणणे आणि इतर प्रक्रिया पाहता पुढील वर्षाच्या बदल्या रखडतील किंवा वेळेत होणार नाही. हे जवळपास स्पष्टच आहे. राज्य स्थानिक जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्तरावर होणाऱ्या बदल्यांबाबत नेहमीच ओरड होत होती. त्यासाठी राज्य शासनाने सॉफ्टवेअर विकसित करून ऑनलाइन बदल्यांचे धोरण ठरविले. त्यानुसार आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता आली. त्यासाठी काही निर्णयही घेण्यात आले. पहिले दोन वर्ष या बदल्या सुरळीत झाल्या. नंतर कोरोना 22-2 काळामुळे दोन वर्ष बदल्या रखडल्या २०२२ मध्ये बदल्या झाल्या. त्या जानेवारी २०२३ पर्यंत चालल्या गेल्याच आठवड्यात या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली.
नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात बदलीपात्र २९७ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागलीच पुढील वर्षाच्या अर्थात २०२३च्या बदली प्रक्रियेसाठी तयारी होईल, अशी अपेक्षा असताना शासनाने बदल्यांचे यापूर्वीचे सर्व आदेश रद्द केले असून, प्रक्रिया नव्याने राबविण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली आहे.
का आवश्यक आहे अभ्यासगट
७ एप्रिल २०२१ रोजीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतर जिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करून त्यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यात काय सुधारणा करायच्या, यासंदर्भात धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. याबाबतचा अभ्यास करून त्या अनुषंगाने शासनास शिफारशी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र अभ्यासगट स्थापन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ हे अध्यक्ष आहेत.
अभ्यासगटात इतर दोन सीईओ, ग्रामविकास विभागाचे उपसचिव, उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय कोकण यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे अवर सचिव असणार आहेत. अभ्यासगटांनी प्रातिनिधिक दुर्गम भागातील शिक्षकांमधील धाकधूक वाढली!
● शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी नेमलेला अभ्यास गट आणि त्यात होणाऱ्या सुधारणा यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता यंदाच्या ऑनलाइन बदल्या रखडतील हे जवळपास स्पष्टच आहे. त्यामुळे बदलीपात्र विशेषतः दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये पुन्हा धाकधूक वाढली आहे.
अभ्यास गटाला एका महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे; परंतु यापूर्वी नेमलेल्या अभ्यास गटांचा अनुभव पहाता एका महिन्यात अहवाल देणे शक्य नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय होऊन सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे आणि त्यानंतर ते कार्यान्वीत करणे या बाबी राहतील.
■तोपर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईल. पावसाळा सुरू होऊन जाईल. त्यामुळे बदल्या होणे शक्य नाही. अर्ध्या शैक्षणिक वर्षात बदल्या करता येत नाहीत. त्यामुळे यंदाचे वर्षीदेखील बदल्या रखडतील, हे जवळपास स्पष्टच आहे. त्यामुळे बदलीपात्र आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना आणखी एक वर्ष बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. प्रातिनिधिक शिक्षक संघटनांकडून चर्चेमधून प्राप्त होणारी माहिती, यासंदर्भातील विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्णय. संगणकीय प्रणाली तयार करणारे अधिकारी, सन २०२२ची प्रक्रिया राबविताना आलेल्या अडचणी सन २०२२ची प्रक्रिया शासनाने वेळोवेळी दिलेली स्पष्टीकरणे याचा तौलनिक अभ्यास ही समिती करणार आहे.
२०२३च्या आंतर जिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक सादर करणे अभिप्रेत आहे. याबाबत अहवाल अभ्यास गटाने एका महिन्यात शासनास सादर करावयाचा आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .