जि.प.हायस्कुल जवळगाव प्रशालेचे NMMS परीक्षेत उज्ज्वल यश!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन 2022-23 मधील या परीक्षेचा निकाल 10 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेमध्ये हिमायतनगर तालुक्यातील जि.प.हायस्कुल जवळगाव शाळेचे 11 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 07 विद्यार्थ्यांनी  उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले.

मन्मथ प्रभाकर पटणे,यशश्री संतोषसिंह ठाकुर,पवन सुनील पांचाळ,कावेरी शंकर पवार, शिवानी संतोष महाजन,दुर्गा चांदराव डोडारणे,प्रेरणा रमेश कोकणे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ज्या पालकांचे उत्पन्न साडे तीन लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा देता येते. एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठवी ते बारावीपर्यंत वर्षाला 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

या विद्यार्थ्यांना विषयशिक्षक चंद्रकांत कदम,वसंत गोवंदे,रमेश माळगे,वैजनाथ चेपूरवार,महेश पडगीलवार,संगमनाथ मुंडकर, श्रीमती सुरेखा कमळू, श्रीमती सारिका येरमवार,श्रीमती सुरेखा गुरुफळे, श्रीमती वंदना ढोकाडे,श्रीमती वैशाली मुस्कावाड,युनिक कोचिंग क्लासेसचे संचालक प्रसाद रावते सर,लक्ष्मण बंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक डी.बी.शिराळे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,ग्रामस्थ व पालकांनी  अभिनंदन करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)