जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळाचा अनोखा उपक्रम !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) .
मारतळा परिषद जिल्हा केंद्रीय प्राथमिक शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपले कुटुंब तंबाखू मुक्त कुटुंब या अनोख्या अभियानास सुरुवात करण्यात आली नंतर कर्करोगाच्या दुष्परिणाम या बद्दल तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक तथा उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
तंबाखूमुळे होणारे कर्करोग यापासून बचाव करण्यासाठी व्यसनापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे व आपल्या परिचयातील लोकांना तंबाखू पदार्थ सोडण्यासाठी प्रवृत्त करावे तसेच माझे कुटूंब तंबाखू मुक्त कुटूंब या अभिनाची सुरवात केंद्र प्रमुख टी पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यात ज्या कुटुंबात कोणीही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत नाही अथवा तंबाखूजन्य पदार्थांचा त्यांनी त्याग केलाय त्या कुटुंबाच्या घराबाहेर माझे कुटुंब तंबाखू मुक्त कुटुंब असे फलक लावण्यात येणार आहेत. यामुळे येणाऱ्या काळात मारतळा हे गाव तंबाखूमुक्त गाव म्हणून ओळखले जाणार आहे.
तंबाखूजन्य पदार्थाची होळी राष्ट्रीय तंबाखू मुक्त बाल परिषदेत सहभागी झालेल्या चैतन्या आंनदा ढेपे हिच्या हस्ते होळी पेटवण्यात आली नंतर तंबाखू मतलब खल्लास आपले गाव तंबाखूमुक्त गाव माझे कुटुंब तंबाखू मुक्त कुटुंब या घोषणा दिल्या सदरील उपक्रम यशस्वी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, होळकर, प्रल्हाद पवार, जयश्री बारोळे ,बालाजी प्यारलावार ,माधुरी मलदोडे , व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .