जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी..

शालेयवृत्त सेवा
0

बदली प्रक्रिया 2022..  दि.20/02/2023




जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी.. 


संदर्भीय क्र.१ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच संदर्भ क्र.२ येथील दि.०३.११.२०२२ रोजीच्या शासन पत्रान्वये, सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी दि.३१.१२.२०२२ पर्यंत सेवानिवृत्ती/निधन/अन्य कारणांमुळे रिक्त झालेली/रिक्त झालेली संभाव्य पदे विचारात घेऊन, ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर रिक्त पदांचा तपशील अद्ययावत करावा, तसेच डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


२. आता, संदर्भीय दि.३१.०१.२०२३ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही माहे फेब्रुवारी, २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे. सदर बदली प्रक्रियेमध्ये जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कार्यमुक्त करण्याचे विचाराधीन आहे.



३. याकरिता, सन २०२२ मधील जिल्हांर्गत बदली प्रक्रियेसाठी दि.३०.०४.२०२३ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन, ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर “अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याच्या राऊंडसाठी” रिक्त पदांचा तपशील अद्ययावत करावा. तसेच एप्रिल, २०२३ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावीत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)