राज्यातील 38 हजार शिक्षकांच्या बदल्या ! मे अखेर रुजू होणार ..

शालेयवृत्त सेवा
0

चौथी यादी जाहीर ; मे अखेर रुजू होणार 




पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबतची चौथी यादी जाहीर केली या यादीनुसार संवर्ग चार मधील 20 हजार 795 शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. याआधी संवर्ग एक दोन आणि तीन मधील मिळून एकूण 16 हजार 605 बदल्या झाल्या आहेत. 


या नव्या बदल्यामुळे आतापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची संख्या आता 38 हजार 490 झाली आहे. दरम्यान बदली झालेले सर्व शिक्षक चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सध्याच्या शाळेवर कार्यरत राहणार आहेत. या शिक्षकांना येत्या 31 मे नंतर सध्याच्या शाळेवरून कार्यमुक्त केले जाणार आहे. 


संवर्ग चार मधील सर्वाधिक 1246 बदल्या यवतमाळ जिल्ह्यातील तर सर्वात कमी म्हणजेच केवळ 105 मधल्या या भंडारा जिल्ह्यातील आहेत. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच बदल्या झाल्या आहेत. आतापर्यंतच्या एकूण बदल्यापैकी याआधी संवर्ग एक , दोन आणि तीन मधील एकूण 16 हजार 605 बदल्या झाल्या आहेत त्यापैकी संवर्ग एक मधील 6 हजार 690 संवर्ग दोन मधील 3 हजार 400 आणि संवर्ग तीन मधील 6 हजार 315 शिक्षकांचा समावेश आहे. 


या बदल्यामुळे तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यापैकी पहिल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्याचे जुने धोरण रद्द केल्याने तर त्यानंतरचे दोन वर्ष कोरोनामुळे जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया राबविता आली नव्हती.


पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती 4 फेब्रुवारी 2020 ला स्थापन केली होती या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे नवीन बदली धोरण अस्तित्वात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)