शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी केंद्र शासनाच्या पात्रता परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना संधी

शालेयवृत्त सेवा
0

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे  शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२




सुधारीत प्रसिध्दी पत्रक

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी केंद्र शासनाच्या पात्रता परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना संधी देणेबाबत.


संदर्भ:- शासन पत्र संकीर्ण- २०२२/प्र.क्र.७०/टीएन-१, दि. ०६/०२/२०२३.

"शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- २०२२" परीक्षेचे दि. २२/०२/२०२३ पासून ऑनलाईन पध्दतीने आयोजन करणेत आले आहे. त्यासाठी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत.


संदर्भिय पत्रानुसार उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) प्रविष्ठ झाले आहेत, परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल TAIT २०२२ परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच दि.०८/०२/२०२३ नंतर लागणार असल्याची बाब विचारात घेऊन TAIT २०२२ परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून TAIT २०२२ साठी ऑनलाईन अर्ज करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

तथापि या उमेदवारांच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (CTAT) परीक्षेचा जो निकाल येईल, तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) साठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे (उदा. Non creamy layer Certificate) इत्यादी मिळण्यास काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन, त्यांना अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास दि. ३१/०३/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) २०२२ साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ ऐवजी दिनांक १२/०२/२०२३ अशी करण्यात येत आहे.


पूर्वीचा कालावधी

दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक ०८/०२/२०२३

दि. ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत,

सुधारीत कालावधी

दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक १२/०२/२०२३

दि. १२/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत.

संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द केली जाईल.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)