संच मान्यतेसाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी असणारी विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार
मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनेनुसार Student Portal मधील विद्यार्थ्यांच्या आधार बाबतच्या कामकाजासाठी अंतिम कालमर्यादा निश्चित करून घेणेबाबत... संदर्भ :- १) मा. आयुक्त (शिक्षण), पुणे यांच्या कार्यालयाकडील पत्र जा.क्र. अंदाज-201/वाकाआ/23-24/1069,
मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 07/02/2023 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये संदर्भीय विषयाबाबत देखील चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान आधार नोंदणी व दुरुस्ती तातडीने करणेबाबत मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार मा. आयुक्त शिक्षण यांनी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सदर कामाकरिता कालमर्यादा निश्चित करून सदर काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे.
संच मान्यतेसाठी दिनांक 30/11/2022 रोजी असणारी विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नसेल त्यांची आधार नोंदणी करणेबाबत तसेच ज्या विद्यार्थ्याच्या आधार नोंदणी मध्ये दुरुस्त्या असतील अशा सर्व विद्यार्थ्याची आधार बाबतची माहिती दिनांक 28/02/2023 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. सदर कामी तालुका स्तरावर उपलब्ध असलेले आधार कीट यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरायची आहे. सदर यंत्रणेमध्ये काही अडचणी असल्यास आपल्या स्तरावर तातडीने दुरुस्त करून सदर कामास प्राधान्य द्यायचे आहे.
यासाठी आपले अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक (मनपा/नपा) यांना तातडीने सूचना देऊन त्यांच्या अधिनस्त केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी इत्यादी यांच्या कामाचे नियोजन करून ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार बाबतची जी काम अपूर्ण आहेत असे विद्यार्थी सरल प्रणालीवरून शाळेकडून उपलब्ध करून घ्यावे आणि सदर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून काम पूर्ण करावे. तसेच बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी पटावर जरी असले तरी ते शाळाबाह्य झालेले असतात. याचा देखील तपास करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .