क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे लवकरच वितरण.. | State Teachers Award

शालेयवृत्त सेवा
0

शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार वितरण






मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्यात आले असून पुरस्काराचे वितरण  मुंबई येथे २४ फेब्रूवारी, २०२३ रोजी होणार आहे.

सन २०२१-२२ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्यात आले असून पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.०३ जानेवारी, २०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुंबई येथे होणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. भारत निर्वाचन आयोगाने दिनांक २९ डिसेंबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या दोन व शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली. 


त्यामुळे येथील दि. ३० डिसेंबर, २०२२ च्या शासन निर्णयात सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम स्थगित करून पुढील दिनांक यथावकाश कळविण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. सन २०२१-२२ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम मुंबई येथे शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०२१५१८४७३४५८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)