शाळा महाविद्यालयात होणार शिवजयंती उत्साहात साजरी

शालेयवृत्त सेवा
0

शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या मागणीला यश !



नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील सर्व शाळ महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम घेवून १९ फेब्रुवारी २०२३ पासून शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात यावा या संबंधीची मागणी मा.राज्यपाल तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी केलेली होती यावर मा.मुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्यासबंधी  शिक्षणमंत्रालय व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे संघटनेच्या मागणीचे निवेदन कार्यवाहिसाठी पाठविण्यात आल्याचे मा.मुख्यमंत्री यांनी मेलद्वारा राज्यउपाध्यक्ष रामचंद्र सालेकर यांना २ फेब्रुवारी २०२३ ला कळविले होते. यावर तातडीने निर्णय घेवून १० फेब्रु २०२३ ला सर्व शाळांमधून १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यात यावी असे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालयाकडून पत्र निर्गमीत करण्यात आले आहे. 


महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' गर्जा महाराष्ट्र माझा' हे स्फुर्तीगीत गावून  यापुढे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात या गीताने करण्याच्या सुचनासुद्धा देण्यात आल्या. यापुढे शाळाशाळातून होणाऱ्या  शिवजयंती कार्यक्रममुळे प्रत्येकाच्या घराघरात मनामनात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय पोहचणार यासाठी मा.मुख्यमंत्री मा.राज्यपाल, मा.शिक्षणमंत्री व संपुर्ण महाराष्ट्र  शासनाचे शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ.नामदेव दळवी, प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड यांनी निवेदन दिले होते.

महासचीव व्यंकट जाधव, कार्याध्यक्ष धनंजय उजनकर(प्रशासन) सविता मोरे (उपक्रम),कोषाध्यक्ष देविदास अंधारे,राज्यउपाध्यक्ष नागपूर विभाग रामचंद्र सालेकर,कैलास सोळंके अमरावती विभाग,अरुण गोर्डे मराठवाडा विभाग,जीवन यादव पश्चिम महाराष्ट्र,निलेश देशमुख कोकण विभाग,प्रेमचंद अहिरराव उत्तर महाराष्ट्र,संघटक बाळासाहेब यादव,रविंद्र चेके, विनाताई काळे,स्मिताताई वैद्य,प्रवक्ता पुरुषोत्तम जाधव,सदस्य मधुकर मोरे हिंगोली,सुधिर गुल्हाने अमरावती,साजिदा हमीद शेख वाशिम,शहाजी देसाई कोल्हापुर तथा शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या सर्व सदस्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)