शिक्षण उपयोगी डिजीटल साहित्य शाळेला देऊन केली वांगी वासियांनी शिवजयंती साजरी...

शालेयवृत्त सेवा
0

 


वांगी गावचा आदर्श  सर्वानी घ्यावा-आमदार मोहनआण्णा हंबर्डे



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत सर्व समाजाला घेवून गावाचा विकास साधण्याचे कार्य या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव जाधव करत आहेत.तसेच शाळेत सात वर्ग व फक्त पाच शिक्षक असताना इंग्रजी शाळांना लाजवेल असा शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत.तसेच शिवजयंती निमित्त शालेय उपयोगी डिजिटल साहित्य शाळेस देवून एक आदर्श वांगी वासियांनी निर्माण केला हा आदर्श सर्वासाठी प्रेरणादायी आहे.असे गौरवोद्गागार सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटक आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी काढले. शिवजन्मोत्सव समिती वांगी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने "सांस्कृतिक महोत्सव 2023"चे आयोजन करण्यात आले होते.

       

यावेळी  जि प सदस्य मनोहर शिंदे ,साहित्यिक तथा गटशिक्षणाधिकारी आर्धापूर व्यंकटेश चौधरी, मनपा नगरसेवक राजु पाटील काळे,सरपंच दत्ता जाधव ,प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अतुल येवतीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक जाधव, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष गंगाधर जाधव ,उपाध्यक्ष संजय जाधव उपाध्यक्ष, सदस्य  राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

     

"सांस्कृतिक महोत्सव 2023" या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक व्यंकट गंदपवाड यांनी  केले. यात विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी हे दुसरे वर्ष  साजरा करताना विविध लोककला यात अभंग, पोवाडा, लावणी, गोंधळ ,राजास्थानी लोकगीत, देशभक्तीपर  गीत ,मराठी, हिंदी, तेलगू, विनोदी लोकगीतातून प्रबोधनात्मक  नृत्य,नाट्याचे सादरीकरण  करण्यात आले.

       

तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी वांगी गावचे युवा सरपंच तथा जिल्हाध्यक्ष विखे पाटील कृषी परिषद नांदेड श्री.दत्ता जाधव यांनी शाळेस इन्व्हर्टर  व शिवसेना तालुका उप श्री. सुरेश जाधव यांनी शाळेसाठी एलईडी,माजी सरपंच श्री.पद्माकर तारू यांनी एलईडी टीव्ही भेट दिली . शालेय व्यवस्थापन समिती वांगी ने शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मदत व्हावी या हेतूने म्युझिक सिस्टम देण्याचा संकल्प केला.


सदर कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव जाधव, उपाध्यक्ष नागोराव जाधव,माजी उपसरपंच अशोक जाधव, माजी शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी गाढे, माजी शा. व्य. स अध्यक्ष दादाराव जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे  उपाध्यक्ष रुखमाजी जाधव, तलाटी ईश्वरकुमार मंडगीलवार, गोविंद जाधव गुरुजी, शिवजन्मोत्सव समिती कार्याध्यक्ष गणेश श्रीराम जाधव, आनंदा जाधव,  तिरुपती जाधव, सहसचिव निलेश जाधव ,सदस्य तुकाराम जाधव ,ज्ञानेश्वर जाधव, सुदर्शन जाधव ,हनुमान जाधव, शिवाजी जाधव ,गणेश गायकवाड, युवराज जाधव, राजू जाधव, युवराज खोंडे,माणिक जाधव गंभीर जाधव प्रशांत जाधव,लखन जाधव,लक्ष्मण जाधव,  सतीश जाधव,तसेच इंजेगावचे सरपंच बालाजी ठोके,मुक्ताजी शहापुरे, बाबुराव जाधव,बालाजी जाधव,मंगेश जाधव, कोब्रा गँगचे सर्व सदस्य, राजू तारु, सचिन जोगदंड, मिलिंद कांबळे,सदाशिव कर्डिले,बालाजी सपोरे, साईनाथ कर्डिले, गजानन म्हस्के, रामेश्वर गुडगे,  सुरेश कदम, यांच्यासह सर्व गावकरी मंडळी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  परिश्रम घेतले.


या कार्यक्रमासाठी वन्नाळी  येथील उपक्रमशील पदवीधर शिक्षक  संगमेश्वर पडलवार, बेळकोणी येथील उपक्रमशील शिक्षक दिगंबर राजबोईनवाड, मुखेड येथील उपक्रमशील शिक्षिका सुचिता सिंगरवाड गंदपवाड,कृषी कनिष्ठ लिपिक नारायण गंदपवाड, ग्रामसेविका संपदा कोनेरी गंदपवाड, शिरड येथील उपक्रमशील शिक्षिका ज्योती किर्तनकार स्वामी,  उपक्रमशील शिक्षक बंडू देशमुख, तुप्पा येथून शिवाजी गाडेवाड, चंद्रकलाबाई गाडेवाड, शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील अधिपरिचारिका रत्नमाला कोकाटे गाडेवाड, उपक्रमशील शिक्षक , संगमेश्वर बिंदगे प्रमुख अतिथी उपस्थित होते.


 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक अजित कदम ,  व्यंकट गंदपवाड ,सारंग स्वामी, गणपत मुंडकर, रुपेश गाडेवाड, तुकाराम कऊटकर, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अतुल येवतीकर ,अजय ठाकुर  अंगणवाडी ताई सौ.अनिता राजू तारु,आरोग्यसेविका सौ. वंदनाताई गजभारे, सौ चंद्रकलाबाई पांचाळ कल्पनाताई खोंडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट गंदपवाड, सारंग स्वामी यांनी तर आभार तंत्रस्नेही शिक्षक गणपत मुंडकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)