सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे - शिक्षकांची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

 

राज्यातील शिक्षकांचा प्रस्ताव; विषमता दूर होईल !



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यात समग्र शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून सरकारी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शाळांमध्ये सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या शाळांमध्ये गणेशावरून निर्माण झालेली विषमता कमी होईल असा प्रस्ताव राज्यातील आदर्श शिक्षकांनी दिला आहे. 


पुढील शैक्षणिक वर्षात शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी आदर्श शिक्षक शिक्षण तज्ञाची मते जाणून घेण्यात आली त्यावेळी विद्यार्थ्यांना सरसकट गणवेश मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र रेषेखालील विद्यार्थी आणि सर्व घटकातील मुलींना दोन मोफत गणवेश दिले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षात गणवेश वाटप करण्यात आले होते मात्र यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेश वेगळे ठेवावे लागतात.



अशी आहे पार्श्वभूमी :

सुरुवातीला सर्वांना शिक्षण मोहीम आणि आताच्या समग्र शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था मधील शाळा पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात 2014 पूर्वी त्यासाठी 400 रुपये दिले जात होते.



यंदाच्या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षण मोहिमेने शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले. पायाभूत सुविधांचेही पूर्तता केली जात आहे. गणवेश संदर्भातही अनेक मागण्या समोर येत आहेत.

- कैलास पगारे, प्रकल्प संचालक समग्र शिक्षण मोहीम

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)