कनकवाडी जिल्हा परिषद शाळेतील सांस्कृतिक कला महोत्सवात विद्यार्थ्यांचा जलवा..

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आझादी का अमृत महोत्सव व गौरव गाथा स्वातंत्र्य सैनिकांची या अमृत महोत्सवी वर्षानिमित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कनकवाडी येथे  आयोजित करण्यात आला होता. किनवट तालुक्यातील कनकवाडी जिल्हा परिषद शाळेतील सांस्कृतिक कला महोत्सवात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर करून उपस्थितांना दाखविल जलवा.


कार्यक्रमाचे उदघाटन प्रतिमा पूजण व दीप प्रज्वलन करून पंडित व्यव्हारे सरपंच, दशरथ शिंदे शा.व्य. स.अध्यक्ष, दिपक राणे सर मुख्याध्यापक, प्रदिप  कूडमेथे सर, घनश्याम गूट्टे सर, शेवाळकर सर , कोटरंगे सर, संतोष गवले सर व गावातील ईतर प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले. 


प्रमूख अतिथीं नांदेड येथे अतिमहत्वांच्या बैठकीला गेले होते, तरिही आमच्या आग्रहाखातर आपला अमूल्य वेळ देत अनिल महामूने साहेब मा. गटशिक्षणाधिकारी तथा अधिक्षक शा. पो.आहार, रमेश खूपसे सर केंद्र प्रमूख तथा केंदीय मुख्याध्यापक, पूलकंठवार सर मुख्याध्यापक राजगड तांडा, सुरेश पाटील सर, दत्ता पटकूले सर इत्यादीं उपस्थित झाल्यानंतर त्यांचे शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला. त्यानंतर  आमच्या लहान बालकांना व पालकांना प्रोत्साहीत करण्यासाठी श्री अनिल महामूने साहेब यांनी मार्गदर्शन केले. 


या कार्यक्रमासाठी गावातील शिक्षण प्रेमी व्यक्तीनी 17,500/₹ पारितोषिक ठेवले होते आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्ती गीत, लोकजाग्रूती नाटिका, कोळीगीते, विनोद व विविध चित्रपट गीत,इत्यादी विविध कलावर आनंदित होऊन माता पालकांनी 15,000/₹ प्रोत्साहन पर पारितोषिक देऊन सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मनापासून कौतुक केले. 


कार्यक्रमाचे  प्रस्ताविक दिपक राणे सर यांणी केले तर सूत्रसंचालन विनायक मुंडे सर व  शेख इब्राहिम सर यांनी केले, वेशभूषा प्रदिप पवार सर व उत्तम मामा  यांनी केली,बैठक व्यवस्थापन अनमोल गायकवाड , गूरनूले सर, बेले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक पेटकूले सर यांनी केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)