सरोवर शिक्षण मंडळात शिवजयंती निमित्त अनोखा उपक्रम

शालेयवृत्त सेवा
0

 



सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

सरोवर शिक्षण मंडळ मधील डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ज्युनिअर कॉलेज आर्ट्स/ कॉमर्स ,जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला , अल अमीन मराठी प्री प्रायमरी- प्रायमरी स्कूल, अल अमीन इंग्रजी प्री प्रायमरी- प्रायमरी स्कूल, सरामद जैनाब इमाम उर्दू प्रायमरी स्कूल सांगली  येथे शिवजयंती निमित्त  शिवरायांचे प्रतिमा पूजन करून राष्ट्रगीत व राज्य गीत गायन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली.

प्रभात फेरीमध्ये शाळेचे वैशिष्ट्ये ,विद्यार्थ्यांसाठी योजना शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम, मूल्य व संस्कार रुजवण्यासाठी घेतली जाणारी उपक्रम यांचे पोस्टर बनवून ती छत्रीला लावून फेरी काढण्यात आले त्याचबरोबर कागदी टोप्यांवर शाळेचे वैशिष्ट्ये उपक्रम लिहून ते विद्यार्थ्यांना घालण्यात आले. प्रभात फेरीमध्ये झांज पथक व लेझीम पथक घेण्यात आले जागोजागी जाऊन विद्यार्थ्यांचे झांज पथक व लेझीम पथक यांचे सादरीकरण करण्यात आले. 


प्रभात फेरी झाल्यानंतर संस्थेचे सचिव माननीय श्री हारून मुल्ला सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक हाजी मुनिरुद्दीन मुल्ला सर,संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एफ एम आकिवाटे,  संस्थेचे सदस्य माननीय श्री सर्वर मुल्ला सर व संस्थेचे सचिव माननीय श्री हारून मुल्ला सर उपस्थित होते त्याचबरोबर सर्व संस्थेच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक   विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)