नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
किनवट तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा रोहिदासतांडा केंद्र कमठाला येथे बंजारा समाजाचे अराध्यदैवत मानवतावादाचे उपासक संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुसया भगवान चव्हाण यांनी केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी बंजारा व मराठी भाषेतून संत सेवालाल यांच्याविषयी माहीती सांगितली. संत सेवालाल महाराज यांच्या वेशभूषेत इयत्ता चौथीतील विद्यार्थी करण चव्हाण यांने आपले विचार व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका शालिनी सेलुकर यांनी सेवालाल यांच्या जीवन कार्य व विचारांवर आपले मत मांडले .शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
विद्यार्थीनी आणि गावातील महिलांनी बंजारी पारंपांरीक वेशभूषा परिधान करून सामूहिक नृत्य व बंजारी भाषेतील भजने सादर केली.गावातील महिलावर्ग बहूसंख्येने या सोहळ्यास उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरूण अमोल चव्हाण यांने विशेष मदत केली.संत सेवालाल भजन गीताने कार्यक्रमांची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .