जि.प. राजगडतांडा शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह..



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव व भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजगडतांडा शाळेत शालेय सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी मोठया उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गोरे  तर उदघाट्क म्हणून राजगडतांडा सरपंच देवानंद कोटूळे, उपसरपंच नागोराव रापनवार उपस्थित होते. तर ग्रा.प. सदस्या अनुराधा नविन जाधव,अश्विनी गजानन राठोड,प्रकाश गोरे,रामराव राठोड (माजी सरपंच) व  गंगाधर बट्टलवार,शेखर चिंचोळकर शासकीय गुत्तेदार तसेच माजी गटशिक्षणाधिकारी तथा शा. पो.आ अधीक्षक अनिल महामुने, केंद्रप्रमुख रमेश खुपसे, पद्माकर कवटिकवार,केंद्रातील शिक्षक प्रदीप पवार,दत्ता शेवाळकर , इब्राहिम शेख,पंडित प्रधान, प्रवीण पिल्लेवार होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पूलकंटवार यांनी सर्व मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केले. या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात  देवा श्री गणेशा,ऐसा देश है मेरा,तेरी मिट्टी मे मिल जावा,शेतकरी गीत ढोलकीच्या तालावर लावणी गिते अंधश्रद्धा निर्मूलन नाटक,दारूबंदी नाटक, पुलवामा हल्ला नाटक सर्व महापुरुष यांची वेषभुषा असे एकूण 30 सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी  संपूर्ण वेशभूषासह सहभाग घेतला होता या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक,माता-भगिनी आजी-माजी विद्यार्थी  यांनी प्रेक्षक म्हणून साद देत सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पूलकुंटवार यांनी केले तर कार्यक्रमाध्ये ग्राप सदस्य गजानन राठोड,मा.गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी मनोगत व्यक्त केले. 


सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे संपूर्ण वेशभूषेसाठी ललिता येलमेवाड,सत्यभामा भगत,किसन कर्णेवार, रघुनाथमामा यांनी तर संगीत लावण्यासाठी संगणकावर प्रवीण पिल्लेवार यांनी काम पहिले आणि सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पडलवार,चंद्रशेखर सर्पे, सुवर्णा वाढई तर आभार प्रेमसागर नेम्मानिवार,मारोती भोसले यांनी केले.सदर कार्यक्रम संपूर्ण  यूट्यूबद्वारे  थेट प्रेक्षपण केंद्रातील पदोन्नती मुख्याध्यापक दीपक डंबाळे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)