जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शरद जोगदंड ) :

देगलूर तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.  कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती मुखेड चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी कैलासजी होनधरने यांच्या हस्ते करण्यात आले. 


प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव बंडे हे होते तसेच देगलूर पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी शिवशंकर जंपलवाड, नायगावचे केंद्रप्रमुख शिवराज साधू, हंगरगा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक शिवाजी मेतलवाड सर, हिब्बटचे पदोन्नत मुख्याध्यापक श्री. सकनुरे सर, कोळगाव नगरीचे सरपंच सौ.राजाबाई शिवाजी श्रीरामे, उपसरपंच सौ.सुशिलाबाई गंगाधर जाधव, माजी केंद्रप्रमुख बाबाराव रामराव वडजे, सेवा सोसायटीचे चेअरमन देविदास दादाराव वडजे, पोलीस पाटील गणपत इबितवार, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी श्रीरामे, बालाजी महाराज सावरगावे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारोती नारायण गायकवाड, उपाध्यक्ष परमेश्वर हणमंत श्रीरामे, बस्वराज साधू, पद्माकर जवळदापके, राम जाधव, राम मोरे, बालगिर धुळशेट्टे, राम टाकले, श्री. गोपुलवाड, सतिश लासुने ह्यांची उपस्थिती होती. 


यावेळी देशभक्तीगीते, छोटी छोटी स्फुर्तीगीते, विविध सामाजिक विषयावरील लोकगीते अंत्यत उत्साहात सादर करण्यात आले. लहान लहान मुले मनसोक्त पणे आपला कलाविष्कार सादर करत होती व त्यांना पालकांचा उदंड प्रतिसाद बक्षीसाच्या माध्यमातून मिळत होता. पालक आपल्या लाडक्यांचा उत्साह पाहुन सढळ हाताने शाळेसाठी देणगी देत होती. जलवा जलवा या देशभक्ती गीताने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. हर हर शम्भू गीताने सर्व गावकरी प्रसन्न झाले. 


शाळेचे मुख्याध्यापक बस्वराज निर्णे यांनी शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले. कारण गावकरी यांच्या सहकार्यानेच शाळा डिजिटल झाली. शाळेची प्रगती झाली. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नारायण (बंटी)पाटील वडजे, संतोष व्यंकटराव श्रीरामे, जेजुरी गायकवाड, शिवा दुब्बेवाड आदींनी अतिशय मोलाची साथ दिली.

        कार्यक्रमचे संचलन श्री. गोविंद विजापुरे सर यांनी केले शेवटी  मुख्याध्यापक श्री. बस्वराज निर्णे सर यांनी सहकार्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)