नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
केंद्र शासनाचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित एनएमएमएस परीक्षेत हिमायतनगर तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शाळा खडकी बाजार या शाळेतील 12 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत खडकी बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील बारा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन यशाची परंपरा कायम राखली आहे.
भगत श्रावस्ती चंद्रकांत, भगत किरण बबन, सोळंके जान्हवी तानाजी, येरेकार मंजुषा सुरेंद्र, ढगे रूपाली तुकाराम, राहुलवार सोहम ज्ञानेश्वर, किनरवाड राजवर्धन शिवाजी, सोनकांबळे संजीवनी विजय, सूर्यवंशी कोमल विकास , टेकाळे श्रेया गजानन , कलाले प्रांजली शंकर , हनवते रूपाली भीमराव या बारा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इम्रानखान पठाण, अमोल जाधव, सतिश इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख रावते डी.एल ,मुख्याध्यापक श्री.भूतनर सर, रायवार सर , गणेश राचुरे, शंकर जाधव, नागनाथ नागरगोजे, श्रीमती माळी मॅडम तसेच सरपंच सौ.प्रिती संजय सुर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.ज्योती तानाजी सोळंके, उपाध्यक्षा सौ.सेरेखा गजानन सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी काैतुक केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .