आमदार मा. माधवराव पाटील जवळगावकर हाते उपस्थित..
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या समारंभास हदगाव हिमायतनगरचे आमदार मा. माधवराव पाटील जवळगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लेझीम संचलनाद्वारे प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले.यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुतनर सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून टाळ्यांच्या साथीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे पाहुण्यांच्या हस्ते धमाक्यात उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगत व शुभेच्छा नंतर सांस्कृतिक कार्यक्रमची सुरुवात एकच राजा इथे जन्मला या गिताने झाली .या संमेलनामध्ये 80 विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला. यामध्ये नृत्य, नाट्य असा विविधरंगी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी खडकी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.प्रिती संजय सुर्यवंशी, उपसरपंच अनिल पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.ज्योती तानाजी सोळंके, उपाध्यक्षा सौ.सुरेखा गजानन सूर्यवंशी, पांडुरंग गाडगे, राहून हनवते, सुभाष पडगेवाड,किशन पवार , प्रसन्नजीत हनवते, परमेश्वर भुरे,सौ.अश्विनी चंद्रकांत भगत,सौ.नंदा पांडुरंग कलाले,सौ.स्वाती व्यंकटेश सूर्यवंशी ,ग्राम पंचायत चे सर्व सदस्य, पत्रकार, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच उत्साही पालक वर्गाचा भरभरून प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन शाळेने केले.
शाळेतील इयत्ता 2 री ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. यात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटीका, विविध वेशभूषा या कार्यक्रमांचा समावेश होता. चिमुकल्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून पालकांचे मन प्रफ्फुलित केले.कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बालकलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने विविध नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेडले. पारंपरिक लोककलाकृतींना उपस्थितांनी मनमुरादपणे दाद दिली.विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आपल्या भाषणात आमदार माधवराव पाटील यांनी शाळेत राबवीत असलेल्या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले तर नृत्यदिग्दर्शन इमरान खान पठाण यांनी केले.आभार श्री इंगळे सतीश यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन गणेश राचुरे, शंकर जाधव व नागनाथ नागरगोजे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शाळा शिक्षकवृंद या सर्वांचा सहभाग मोलाचा ठरला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .