मार्च मध्ये श्रीहरीकोटा येथील अंतरिक्ष केंद्र पाहणार !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा मधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सहल मार्च महिन्यात अंतरिक्ष श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश येथे काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम असून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले आहे.
उपग्रह प्रेक्षपणाचा प्रत्यक्ष अनुभव तुंबा येथील स्पेस म्युझियम विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम चा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा संशोधन वृत्तीचा विकास व्हावा विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी नवनिर्मितीस हातभार लागावा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रिया कळावी या हेतूने अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे गुणोत्तर पूर्ण शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येत आहे.
यासाठी जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेऊन करण्यात येणार आहे. ही सहल मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काढण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. केंद्रस्तरावर दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी परीक्षा होईल यात वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 50 प्रश्न विचारले जातील आणि एकूण 100 गुणांची ही परीक्षा असेल. तालुकास्तरावर 3 मार्च 2023 रोजी 75 प्रश्नाचे 75 गुणाचे ही परीक्षा असेल आणि जिल्हास्तरावर 10 मार्च 2023 रोजी 75 प्रश्नाचे आणि 75 गुणांची परीक्षा असेल. केंद्रातून निवडलेले विद्यार्थी तालुक्यावर आणि तालुक्यातील निवडलेले विद्यार्थी जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांची प्रति तालुका तीन याप्रमाणे एकूण सोहळा तालुक्यातील 48 विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत.
यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रित समिती स्थापन करण्यात येत आहे. अंतरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष तर सदस्य सचिव या शिक्षणाधिकारी प्राथमिक आहे. या समितीत उपशिक्षणाधिकारी प्राथमिक आणि जिल्ह्यातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसविण्याच्या आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे.
अशी होईल विद्यार्थ्यांची निवड :
केंद्रस्तरावर दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी परीक्षा होईल यात वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 50 प्रश्न विचारले जातील आणि एकूण 100 गुणांची ही परीक्षा असेल. तालुकास्तरावर 3 मार्च 2023 रोजी 75 प्रश्नाचे 75 गुणाचे ही परीक्षा असेल आणि जिल्हास्तरावर 10 मार्च 2023 रोजी 75 प्रश्नाचे आणि 75 गुणांची परीक्षा असेल. केंद्रातून निवडलेले विद्यार्थी तालुक्यावर आणि तालुक्यातील निवडलेले विद्यार्थी जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून विद्यार्थ्यांची प्रति तालुका तीन याप्रमाणे एकूण सोहळा तालुक्यातील 48 विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .