विद्या अमृत महोत्सव अंमलबजावणी बाबत मा.उपसंचालक यांचे महत्वाचे पत्र | Implementation of Vidya Amrit Mahotsav

शालेयवृत्त सेवा
0

 विद्या अमृत महोत्सव अंमलबजावणी



      शिक्षक पर्व कार्यक्रमातील विद्या अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम म्हणजे माईक्रो इम्परुमेंट एलइडी इंनोवेटिव्ह पेडागॉजी स्पर्धा संपूर्ण देशात अतिशय उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आली. या उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांमार्फत शालेय स्तरावर घेण्यात येत असलेल्या अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतींचे चित्रफिती दीक्षा एपवर मागविण्यात आले होते. यातून उत्कृष्ट अध्यापन पद्धती वापरणाऱ्या शिक्षकांना  जिल्हा/ राज्य/राष्ट्रीय स्तरावरून सनन्‍्मानित करण्यात येणार आहे. यासाठी अंतिम मुदत दिनांक ३१/१२/२०२२ होती.


             दिनांक ३१/१२/२०२२ पर्यत राज्यातून एकूण ८३० शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षकांनी या पुरस्कारासाठी आपले चित्रफिती  दीक्षा अंपवर अपलोड करून नामांकन केलेले होते. दिनांक १३/०१/२०२३ अखेर जिल्हास्तरावर ८३० शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचेमूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन करुन एकृण ४४ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांची राज्यस्तरावर मूल्यमापनासाठी शिफारस प्राप्त झाली आहे. तसेच राज्यस्तरावर ४४ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे मूल्यमापन समितीमार्फत मूल्यमापन करुन अंतिम एकूण १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांची शिफारस प्राप्त झाली आहे. यातील उत्कृष्ट ०३ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती  यांची शिफारस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रक्रियेसाठी करण्यात येणार आहे. हे मूल्यमापन करण्यासाठी   खालील पुढील ०३ निकष ठरविण्यात आलेले आहेत.-


. प्रस्तुत चित्रफित  किती वेळा पाहण्यात आलेली आहे

. चित्रफित पाहण्याचा सरासरी वेळ

. चित्रफितीस प्राप्त रेटिंग


खाली दिलेल्या लिंकमध्ये १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती  यांचे दीक्षाप्रणालीवरील लिक एकत्र स्वरुपात आपणास पुरविण्यात आले आहेत. 


https://diksha.gov.in/resources/play/collection/do_3137284674101903361112?contentType=Collection


यास्तव आपण उपरोक्त सोबत दिलेले राज्यस्तरावरील अंतिम १५ शिक्षक/ शिक्षक प्रशिक्षक यांचे शैक्षणिक चित्रफिती  पाहून दिनांक ३१/०३/२०२३ अखेर रेटिंग करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक, विद्यार्थी क्षेत्रीय अधिकारी यांना सूचित करावे.


कृपया प्रस्तुत लिंक वर क्लिक करून आपणास उजव्या बाजूस सर्व १५ चित्रफिती उपलब्ध होतील. आपण आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक, विद्यार्थी क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक ३१/०३/२०२३ अखेर सर्व १५ चित्रफिती  -१करून पूर्णवेळ पाहण्याबाबत चित्रफितीचे शेवटी योग्य ते रेटिंग देण्याबाबत संबंधितांना अवगत करण्यात यावे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)