द्विवर्षपूर्ती निमित्ताने केलं काव्यपुष्प अर्पण ...
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे (भा. प्र. से.) यांच्या नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून द्विवर्षपूर्ती निमित्ताने या दोन वर्षात विविध विभाग विषय व प्रसंगावेळी आपल्या कार्यशैलीचा प्रशासन व समाज मनावर जी अटीव छाप आणि जनमानसाच्या हृदयात नाव कोरले आहे. अशीच अनुभूती उषा नळगिरे सहशिक्षिका तथा कवयित्री, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पार्डी (मक्ता)तालुका- अर्धापूर जिल्हा - नांदेड यांना मॅडमनी दिलेल्या शाळा भेटी वेळी व विविध प्रासंगिक कार्यक्रमाच्या भेटी दरम्यान प्राप्त झाली आहे. त्या भावभावनांना काव्यात्मक आविष्काराच्या रूपातून व्यक्त केले आहेत.
माननीय वर्षा ठाकूर - घुगे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,नांदेड यांच्यावर लिहिलेली कविता प्रत्यक्ष मॅडमला भेटून ती समर्पित करावयाची अशी तळमळ सप्टेंबर महिन्यापासून उषा नळगिरे यांच्या मनात होती. आज तो योग जुळून आला व उषा नळगिरे यांची इच्छापूर्ती झाली. उषा नळगिरे यांनी सुंदर अशा मानपत्रावर ही कविता छापून मॅडमला समर्पित केली. माननीय श्रीमती वर्षा ठाकूर - घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उषा नळगिरे यांनाच स्वतःवर केलेल्या कवितेचचे वाचन करायला लावून शाळा भेटी दरम्यानचा तुझे काम पाहून मी अभिनंदन केले होते हा प्रसंग आजही मॅडमला लक्षात असून त्याला उजाळा दिला.
तुझे काम चांगले असून लेखनशैली देखील भारदस्त आहे. लेखनाची आता ही सुरुवात झाली असून लेखन न थांबविता अधिकाधिक यशोशिखरावर जाऊन तुझे पुस्तक प्रकाशित व्हावे व मी कलेक्टर असताना तू ते पुस्तक मला पाठवावे अशी इच्छा आणि शुभाशीर्वाद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिल्या. उषा नळगिरे यांनी लिहिलेल्या कवितेवर प्रतिक्रिया देत असताना मी खूप आनंदी व भावनिक झाले असून मला तुझा अभिमान वाटतो असे म्हणत अभिनंदन व भरभरून कौतुक केले.
हिच आहे ती कविता -
मा. वर्षा ठाकूर मॅडम खरच तुम्ही ग्रेट आहात,
आमच्या काळजात थेट आहात.
नावातच आहे सामर्थ्य चातकाची तहान भागवण्याचे,
काटे झेलूनही सदाहरित राहण्याचे बळ हे निवडूंगाचे,
काट्यात गुलाब अन् चिखलात कोवळे हास्य कमळाचे,
तसे आहे अस्तित्व तुम्हचे...
नजरेत तुमच्या नेहमीच असते क्षितीजापलीकडे झेप घेण्याची आशा,
त्याप्रमाणे ठरवता ध्येय धोरण आणि दिशा..
नांदेड जिल्ह्याला लाभला तुमच्या रूपाने मातृमुखी चेहरा,
बालकाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने
प्रत्येक उपक्रमात असतो सर्जनशीलतेला आसरा.
त्यामुळे आपोआपच होते ध्येयपूर्तता.
आपल्या सूचना आम्हास मुळीच वाटत नाहीत आदेश
प्रत्येक कृतीत तुम्हचापण असतो कृतीयुक्त सहभाग,
कधी जाणवत नाही थकवा कामाचा
जेव्हा तुम्ही पोहचता सकाळी वस्त्या तांड्यावर
खरोखरच महान पदावर असूनही आपण जपता सामाजिकता आणि हजारो निरागस चेहऱ्यावर आणता हसू . .
खरतर आज द्विवर्षेपूर्ती पण जमणार नाही काही शब्दात बांधण्यास,
कारण सागरालाही सामावता येणार नाही चार भांड्यात.
कधीही गर्व नाही उच्च पदाचा याचाच अभिमान वाटतो आम्हास,
१०० तोफांची सलामी आपल्या कार्यास..
खरचं...
पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते आम्हास
खरच तुम्ही ग्रेट आहात आमच्या काळजात थेट आहात.
खरच तुम्ही ग्रेट आहात आमच्या काळजात थेट आहात...
- उषा नळगिरे
शिक्षिका जि. प.प्रा शाळा पार्डी (म) नांदेड
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .