केंद्रप्रमुख भरती कधी होणार ? सारीकडे प्रभारी राज !

शालेयवृत्त सेवा
0

 राज्यात 4160 पदे रिक्त नऊ वर्षापासून भरतीची प्रतीक्षा !



नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय पातळीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे तसेच शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने राज्यात दहा ते बारा शाळांसाठी सन 1994 मध्ये केंद्रप्रमुखाचे पद निर्माण करून 4860 पदे भरले. मात्र सध्या राज्यात 4 हजार160 पदे रिक्त आहेत. त्याकरिता केंद्रप्रमुखांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावेत अशी मागणी होत आहे. 


जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत येणारे केंद्रप्रमुखांचे निम्म्यापेक्षा जास्त पदे प्रत्येक जिल्ह्यात रिक्त आहेत. हे पदे शासनाच्या दुर्लक्षामुळे भरण्यात आलेले नाहीत बदलत्या परिस्थितीत शिक्षण विभागाच्या कामाचा पसारा वाढत असल्याने त्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर केंद्रप्रमुखांची पद भरावीत अशी मागणी सध्या जोर धरत आहे. निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने प्रभारी केंद्रप्रमुखावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. पूर्वी केंद्रप्रमुखांची शंभर टक्के पदे शिक्षकांमधून सेवा जेष्ठतेनुसार भरण्यात येत होते 2010 च्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची चाळीस टक्के पदे सरळसेवेने 30 टक्के पदोन्नतीने आणि 30 टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारे भरण्याचे आदेश होते. 


त्यामध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे 10 जून 2014 च्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आले मात्र केंद्रप्रमुखांची सरळ सेवेची व विभागीय परीक्षा द्वारे पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा ग्रामविकास विभागाने केंद्रप्रमुखाचे पदे तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्याच्या आदेश दिले होते. त्यानंतर अजूनही म्हणजेच नऊ वर्ष उलटले तरी केंद्रप्रमुखाची भरती झालेली नाही ही भरती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटना शासनाशी लढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)