नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्याते प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या वतीने एम.ए. मराठी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित ग्रंथलेखन कार्यासाठी लेखक म्हणून निमंत्रित करण्यात आले. तसे पत्र संचालक डॉ. मनीषा जगताप (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांनी पाठवले आहे.
डॉ. हनुमंत भोपाळे यांचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून लौकिक असून ते वेगवेगळ्या विषयावर सातत्याने प्रबोधनाचे कार्य करतात. त्यांचे पंधरा ग्रंथ प्रसिद्ध असून महाराष्ट्र शासन आणि वेगवेगळ्या संस्थानी त्यांच्या लेखनाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या यशाचा राजमार्ग ह्या ग्रंथाची निवड उत्कृष्ट ग्रंथ म्हणून केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादाचे वक्ते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. हनुमंत भोपाळे यांच्या लेखनशैलीचा उपयोग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठ जळगाव यांना होणार असल्याने सदरील विद्यापीठाने निवड केल्याबद्दल अनेक मान्यवरांकडून डॉ. हनुमंत भोपाळे यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .