छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गणेशपूर (जुने) शाळेत चित्ररंगभरण स्पर्धा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातिल जि.प.प्रा.शा.गणेशपूर (जुने) शाळेत छत्रपती शिवाजीमहाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या चित्राची चित्ररंगभरण स्पर्धा येण्यात आली .सुत्रसंचलन डि.एस.डब्ल्यू ची विद्यार्थीनी रूपाली गायकवाडने केले. 


यावेळी प्रथम दीप प्रज्वलन करून छ.शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पुष्पहार अर्पण करून राज्यगीताचे गायन करण्यात आले.त्यानंतर सोमकार गजानन कर्हाळे या ईयत्ता दुसरीच्या विद्यार्थाने छ.शिवाजीमहाराज यांचे जीवन चरित्र  सांगणारे छान व उत्तम सादरीकरणा सहीत भाषण केले .शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रवीण पिल्लेवार यांनी महाराजांच्या जीवन  कार्याची थोडक्यात माहीती दिली .गावचे माजी.सरपंच श्री. तुकाराम आत्राम यांनीही छान थोडक्यात माहीती दिली .स.शि.श्रीम.ऊर्मिला परभणकर यांनी छ.शिवाजीमहाराज यांच्या बालपणीच्या कार्य बद्दल बालकांना सोप्या गोष्टी स्वरुपात माहीती दिली विद्यार्थी अगदी उत्साहात ऐकत होते. रविवार सुट्टीचा दिवस असुनही विद्यार्थी उत्साहाने कार्यक्रमला हजर होते.


शालेय व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष श्री विजय मेश्राम उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .अंगणवाडी सेविका श्रीमती.कल्पना बावणे,डी.एस.डब्ल्यू चे स्वयंसेवक विराज चव्हाण,संदिप पवार,अर्षद शेख, दासेवार व शालेय पोषण आहार कर्मचारी पारूबाई आत्राम व  प्रकाश आत्राम उपस्थीत होते .विद्यार्थ्यांना वेगवेगळी छ.शिवाजीमहाराज यांचे चित्र व रंगपेन्सील दिली .सर्वांनी मन लावून एकाग्रतेने बसून चित्र रंगवली .त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनां फळ वाटप करण्यात आले .आभार प्रदर्शन अर्षद शेख यांनी केले . शेवटी छ. शिवाजीमहाराज पोवाडा ऐकून छ.शिवाजीमहाराज यांच्या नावाचा  जय घोष केला .जय जय जय भवानी जय शिवाजी .छ.शिवाजीमहाराज की जय.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)