निसर्ग सहल ; गणेशपूर (जुने) शाळेची विविध स्थळांना भेटी..

शालेयवृत्त सेवा
0

 

जि.प.प्रा.शा.गणेशपूर (जुने) शाळेची विविध स्थळांना क्षेत्रभेट !



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जि.प.प्रा.शा.गणेशपूर(जुने)येथील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आजुबाजुला असलेल्या बंधारा,डोंगर,शेती व छोट्या खदानीला भेट दिली.प्रथम जवळच असलेला बंधारा पाहीला त्याचा उपयोग व फायदे गावाला कसे होतील याची माहीती शाळेचे मु.अ. प्रविण पिल्लेवार यांनी दिली. 

त्यानंतर परिसरातील शेतातील  पिक पाहात व विविध झाडांची  माहीती घेत पुढ डोंगरावर गेले त्या ठिकाणाची विविध झाडे, फुल ,फळे ,डिंक याची माहीती शा.पो. आ. कर्मचारी पारूबाई आत्राम व प्रकाश आत्राम यांनी दिली . वनभोजनात खिचडी,जिलबी,चिवडा ,शिरा व गाजराच्या हलव्याचा आस्वाद घेतला. 

परत येतांना विट्टभट्टी साठी मातीचे खनन केलेल्या खदानीला भेट दिली .कॅनल काठी व शेतात विद्यार्थ्यांचे खेळ अंधळीकोशिंबीरी ,कबड्डी,अंताक्षरी स.शि.श्रीमती ऊर्मिला परभणकर यांनी घेतले . झाडांवर चढून बोरे व हिरव्याचिंचा खाल्या .एकंदरीत  सर्व विद्यार्थ्यी व शिक्षक दिवसभर आनंदाने उत्साहात अनुभव घेत होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)