सुधारित संरचनांचा केंद्रनिहाय प्रारूप आरखडा तयार होणार..

शालेयवृत्त सेवा
0



जिल्हा परिषदातील प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाची सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकूण ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


सदरची केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या १० प्राथमिक शाळाकरिता १ याप्रमाणात निश्चित करण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत नविन शाळा मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळे सदर मंजूर केलेली केंद्रसमूहाची संरचना सुधारित करणे आवश्यक असलेबाबत संदर्भीय आदेश क्र २ अन्वये निर्देश दिलेले आहेत. 


सद्यस्थितीत मंजूर असलेल्या पदांमध्ये समान शाळा वाटप व भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन केंद्रसमूहाची सुधारित संरचना करण्यात यावी. त्यानुसार आपण सुधारित संरचनांचा केंद्रनिहाय प्रारूप आरखडा तयार करुन दिनांक १०.०२.२०२३ पर्यंत केंद्रसमूहाची सुधारित संरचनेचा प्रत्येक केंद्रास जोडण्यात आलेल्या शाळांच्या नावासह प्रस्ताव संचालनालयास सादर करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)