खेळीमेळीच्या वातावरणात शेवडीच्या शिक्षण परिषदेची सांगता

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दक्षिण विभागातील शेवडी बाजीराव केंद्राची माहे डिसेंबरची शिक्षण परिषद जि. प. प्रा. शा. फुलेनगर ,पेनुर येथे शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली होती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदरील शिक्षण परिषद पार पडली. प्रस्तुत परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेवडी बा. केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नागोराव जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरस्वती अंबलवाड, माजी शिक्षणविस्तार अधिकारी अमिन पठाण हे होते. 


प्रमुख पाहुणे म्हणून पेनूर जिपहाचे मुख्याध्यापक बालाजी काळेवाड, नांदेड जिल्हा शिक्षण पतसंस्थेचे संचालक संतोष अंबुलगेकर, शेवडीचे मुख्याध्यापक बालाजी गायकवाड, दगडगावचे मुख्याध्यापक अशोक राऊत, बेटसांगवीचे मुख्याध्यापक उद्धव मुळे यांची उपस्थिती होती. 


सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून परिषदेची सुरुवात करण्यात आली. जोशी व्ही.सी. ( प्रा.शा. शेवडी तांडा ) यांची प्रार्थना तदनंतर जि. प. हा. पेनुर च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.


प्रास्ताविकात श्री संदीप साखरे ( मु. अ. प्रा. शा. फुलेनगर ,पेनुर ) यांनी परिषदेचे महत्त्व व गरज यावर प्रकाश टाकला. त्यानंतर शिक्षण परिषदेच्या नियोजनाप्रमाणे सुलभक श्री उद्धव मुळे सर ( प्रा. शा. बेटसांगवी क्र. 1 ) , यांनी असर अहवालाचे सविस्तर स्पष्टीकरण व त्यासंबंधी बाबी यांचे विश्लेषण केले त्यानंतर सौ . सुजाता कदम मॅडम ( जि. प. हा .पेनुर ) यांनी विद्यार्थ्यांच्या लाभाच्या विविध योजना यात शिष्यवृत्ती , पीएम -पोषण ,शालेय गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, एसटी - पास , मोफत सायकल वाटप इत्यादी शालेय योजना यावर उपस्थिताना सखोल मार्गदर्शन केले. 


द्वितीय सत्राच्या सुरुवातीस श्री कोल्हे आर. बी. ( प्रा. शा. बेटसांगवी क्र . 2 ) यांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीतील अंतर्भूत मुद्दे व नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती गरज यावर प्रकाश टाकला. नंतर श्री जोशी व्ही. सी . ( प्रा. शा. शेवडीतांडा ) यांनी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करावयाचा कृती आराखडा कसा तयार करावा याचे प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण केले. अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागोराव जाधव ( केंद्रप्रमुख शेवडी, बा .) यांनी प्रशासकीय सूचना व उपस्थिततांना सखोल मार्गदर्शन केले त्यात संभाव्य धोके तसेच राबवयाचे उपक्रम यावर स्पष्टीकरण दिले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा भालेराव मॅडम जि. प. हा. पेनुर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीराम कलने ( मु. अ. प्रा. शा. पळशी ) यांनी केले तर मध्यंतरात प्रस्तुत शाळेचे मु. अ. श्री संदीप साखरे , श्री दत्ता पुणेगोविंदवाड सर, श्री राठोड सर यांच्यातर्फे उपस्थितांना सुरुची भोजनाची सोय करण्यात आली. याप्रसंगी गावचे उपसरपंच श्री फरकंडकर, गावचे माजी सरपंच श्री बाबाराव पाटील , शा. व्य. स. अध्यक्ष श्री वडजे, उपाध्यक्ष राहुल एडके, पत्रकार श्री वीरभद्र येजगे, श्री चंद्रकांत एडके यांच्यासह अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)