रत्नाळी केंद्राची सातवी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी केंद्राची सातवे शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा थडी येथे दि. ०१ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक एम. एस. वारले तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, साधनव्यक्ती आर. आर. खाटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मीनाताई बोमले आणि पाटोदा थडीच्या सरपंच सौ. रेखा येताळे हे होते. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


त्यानंतर येथील पाचव्या वर्गातील मुलींनी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य सादर केले. प्रथमतः लालन्ना गुडलावार यांनी असर रिपोर्ट बाबत माहिती दिली. राजेश्वर इंदूरकर यांनी नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीविषयी माहिती दिली आणि प्रत्येक शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा याविषयी डॉ. पी. जी. पालेंचवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटच्या तासिकेत नासा येवतीकर यांनी विद्यार्थी लाभाच्या योजनाची विस्तृत अशी माहिती दिली. 


कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रस्तुत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सपना अमृतवार, उपक्रमशील शिक्षिका सौ. अर्चना नंदगावकर, अंगणवाडी शिक्षिका उमाबाई बोमले आणि जनाबाई येताळे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासा येवतीकर यांनी केले तर उदयकुमार शिल्लारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात रत्नाळी केंद्राचे सातवे शिक्षण परिषदत संपन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)