निळा जिल्हा परिषद शाळेत बाल अविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात..

शालेयवृत्त सेवा
0

  


   

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :        

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि. नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि मा जिजाऊ जयंती निमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बाल अविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमाचे उदघाटक लता कवठेकर शि.वि.अ. बीट निळा यांनी केले तर प्रमुख पाहुणे  म्हणून श्री मोरे सर शिवाजीराव जोगदंड अध्यक्ष, शंकर कदम उपाध्यक्ष, किशनराव जोगदंड, माधव जोगदंड समिती सदस्य , सरपंच सौ कोमल रोहित हिंगोले यांच्यासह 100% माता पालक वर्ग उपस्थित होता.


आमच्या शाळेतील विदयार्थी आणि विदर्थिनींनी देशभक्तीपर गिते, गोंधळून , लावणी अशी एकापेक्षा एक उत्कृष्ट गिते सादर करून श्रोत्यांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा बरोबर बक्षीसचाही वर्षाव करण्यात आला. अध्यक्ष शिवाजीराव भाऊराव जोगदंड यांच्या मातोश्री या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. उदघाटक म्हणून आदरणीय कौठेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.  


प्रस्तविक शाळेचे मुख्याध्यापक पोहरे कैलास पिराजी यांनी केले. कार्यक्रमचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती वाघमारे मॅडम यांनी केले. आभारप्रदर्शन श्रीमती मोखंडपल्ले एस.एन.यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्रीमती पांडे एस. बी., श्रीमती गंजेवार व्ही.एल., श्रीमती पाम्पटवार पी.एस. श्रीमती रत्नपारखी एस. बी. श्रीमती वाघमारे जे.कें. श्रीमती कर्णेवार पी.पी. श्रीमती मोखंडपल्ले एस. एन. श्री बेळगे एस.एच श्री पोहरे कें. पी. आणि शालेय व्यवस्थापन समिती चे खूप मोठे सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)